Ticker

6/recent/ticker-posts

इगतपुरी तालुकात मातृत्व शिबिर


श्री. राजेश रघुनाथ लोखंडे तालुका प्रतिनिधी इगतपुरी जिल्हा नाशिक 

इगतपुरी:-आज दिनांक रोजी 16/07/22 इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे हॉटेल किणारा हॉल आग्रारोड बायपास इगतपुरी घोटी येथे  मोफत मातृत्व शिबिर घेण्यात आले. मातृत्व प्राप्त होण्यात वैद्यकीय किंवा मानसिक अडचण असलेल्या इगतपुरी आणि घोटी परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर घेण्यात आले. हॉटेल किणारा हॉल आग्रारोड बायपास येथे झालेल्या शिबिरात संतती फरट्यालिटी सेंटरच्या डॉ. अनिता कोळी यांनी आणि त्यांच्या सहायक डॉक्टरांनी महिला आणि जोडप्यांना मनोधैर्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. संतती होण्यासाठी नवनवीन वैद्यकीय शोध आणि उपलब्ध वैद्यकीय उपचारपद्धती यांची सविस्तर माहिती दिली. शिबिराचे उद्घाटन  करण्यात आलेल्या शिबिरासाठी  डॉ. अतुल डोंगरे, डॉ. स्वाती डोंगरे, संकेत होगाडे आदींनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या