संजय ठोंबरे, जिल्हा विशेष प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर:-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबीर १५ जुलै ला दुपारी २.१५ वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख सुधाकर व्ही. यार्लगड्डा हे होते.
या कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालकांचे अधिकार, बालिकांचा शिक्षणाचा अधिकार आदी विविध विषयांवर मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव श्रीमती भाग्यश्री का पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश मा. श्री. सुधाकर व्ही. यार्लगड्डा साहेब यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये कोणते कामकाज चालते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या लोकांसाठी देण्यात येणा-या विधी सेवां या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालणा-या योजनांचा मागोवा घेतला. सर्व ग्रामसेवकांना लोकअदालतीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामसेवक ग्रामसेविका मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राधिकरण चे अध्यक्ष यांनी ग्रामसेवकांना गरजु जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा दूत बनण्याचे आवाहन केले.
अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या कनिष्ठ लिपिक श्रीमती भारती पाठक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या कनिष्ठ लिपिक विकास कर्डिले, यांनी आभार मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या तसेच जिल्हा न्यायालयाच्या सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या