सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज
वाशिम: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत वाशिम येथे मुलांसाठी ९० व १२५ क्षमता असलेली दोन वसतीगृहे आणि मुलींसाठी ७५ व १२५ क्षमतेची दोन वसतीगृहे अशी एकूण चार वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची एक प्रत वसतीगृह कार्यालयात जमा करावी. असे आवाहन अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी व गृहपाल, आदिवासी मुला व मुलींचे शासकीय वसतिगृह वाशिम यांनी केले आहे.


0 टिप्पण्या