*तुझे नाम।*
*आन न करी काम जिव्हामुखें*
देवा! तुझ्या रूपाचे मी सदैव ध्यान करेन.....
तुझे अमृतमधुर नाम मी सदैव
गात राहीन.....
माझी जीभ प्रपंचातील भास-
मान गोष्टी बोलत बसणार नाही.......
तुझे चरण मी डोळ्यांनी पाहीन
आणि त्यांवर प्रेमभावे मस्तक ठेवीन......
शरणागत भावाशिवाय मी दुसरे
काही करणार नाही.......
तुझे गुणगान मी श्रवण करीन.......
आता द्वैताचे विचार ऐकणार नाही.......
मी तुझ्याकडे चालत येईन.....
तुझी विनम्रभावे सेवा करीन.....
तुझ्या प्रेमस्वरूपाशिवाय मी अन्य ठिकाणी जाणार नाही.....
तुकाराम महाराज म्हणतात,
देवा,तुला मी जीव अर्पण केला
आहे......
आता दुसऱ्याला देण्यासारखे
काही शिल्लक नाही.....
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷


0 टिप्पण्या