सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
महाराष्ट्राचे निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील युगपुरुषांचा अनेक वेळेस अपमान करणाऱ्या अपण काय बरळत आहोत याचे भान नसलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचे यांचेकडून या देशात व राज्यात महिलांसाठी शिक्षण सुरू केले त्यांच्याबद्दलही गरळ ओकली. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अपमान जनक वक्तव्य करत आहे. ही भाजपची मंडळी समाजाचे विघटन करण्यासाठी गैरकृत्य करत आहेत. कोश्यारी व त्रिवेदी हे लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात व राज्यात यांचे सरकार असल्याने ते अशा वाचाळ लोकांचे लांगुलचालन करत आहेत. असे समाजात तेढ पसरवणारे वेगवेगळे काढून समाजात फूट पाडून देशावर हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जनतेने यांच्यापासून सावध व्हावे. तसेच जो पर्यंत कोशीयारी यांची या राज्यातुन हक्कालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्याचा जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वच स्तरातून जाहीर निषेध केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिव्र निषेध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जामखेड येथिल खर्डा चौक येथे काल दि. २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने "कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून" तिव्र अंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून व घोषणाबाजी करून भगतसिंग कोश्यारींचा तिव निषेध करण्यात आला.
यावेळी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा. मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,
नगरसेवक मोहन पवार, शहराउपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रकाश काळे, संभाजी बिग्रेड तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष कुंडल राळेभात, प्रा.लक्ष्मण ढेपे, , उमर कुरेशी अमित जाधव, संजय डोके, इस्माईल सय्यद, प्रविण उगले, युवा नेते महेश राळेभात, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाला उर्जा देणारे राजे आहेत, रशियाचा राष्ट्रध्यक्षाच्या दालनात महारांजाची प्रतिमा लावलेली आहे. संपूर्ण जगात छ. शिवाजी महाराज यांचा आदर केला जातो मात्र या महाराष्ट्रात कोश्यारी सारख्या व्यक्तीकडुन सातत्याने अवमान केला जातो याची मोठी खंत वाटते. ज्यांना इतिहास माहित नाही त्यांनी असे कोणतेही विधान करू नये. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तडकाफडकी पंतप्रधान व गृहमंत्री यांना सांगुन कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे अन्यथा राष्ट्रवादी सातत्याने तीव्र आंदोलन केले जाईल असेही मत तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांची भाषणे झाली.


0 टिप्पण्या