महाराष्ट्राला इतिहास आहे.महाराष्ट पुरोगामी आहे.महाराष्ट्र संतांची भुमी आहे.महाराष्ट्र वीरांची भुमी आहे.असे पुरस्तकात ,पेपरात,किर्तनात,प्रवचनात सांगितले जाते.पण प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत आहे.रोज पेपर उघडला,टिव्ही लावला कि,येथे तर दोनचार बलात्काराच्या,दोन चार भ्रष्टाचाराच्या ,दोनचार पुतळे जाळण्याच्या,दोनचार चप्पल मारण्याच्या बातम्या पाहायला मिळतात.आज तरी महाराष्ट्रात चप्पलमार संस्कृती विकसित झाली आहे.कोणत्याही विचारवंतांनी किंवा राजकीय व्यक्ती ने काही स्टेटमेंट दिले कि,त्याचा वैचारिक विरोध न करता,सरळ बैनरवर फोटो छापून मोर्चा काढतात.कैमेरावाले मोबाईल घेऊन व्हिडिओ व्हायरल करतात.पेपर वाले ती बातमी पहिल्या पानावर छापतात.टिव्ही वाले ती बातमी दाखवण्यात अग्रेसर असतात.कोणीही विचार करीत नाहीत कि,याद्वारे नवीन पिढीला काय शिकवत आहोत.तरीही माध्यमांना चौथा स्तंभ म्हणायचे का? चुकीचे आहे.बलात्काराचे सीन,बेडरूमचे सीन, चप्पलहार चे सीन दाखवणे कोणत्या संस्कृतीत मोडते?
महाराष्ट्रातील सर्वच पक्ष उठसूठ चप्पलहार कार्यक्रम घेत आहेत.राणे काही बोलले दुसऱ्या दिवशी चप्पलहार कार्यक्रम.राज्यपाल काही बोलले, दुसऱ्या दिवशी त्यांच्या फोटो ला चप्पलहार कार्यक्रम.आव्हाड काही बोलले , दुसऱ्या दिवशी चप्पलहार कार्यक्रम.खडसे काही बोलले , महाजन काही बोलले, दुसऱ्या दिवशी चप्पलहार कार्यक्रम.या कार्यक्रमात दिसणारे चेहरे,माणसे आणि बाया कोणते राजकारण करीत आहेत?यांची हिच वैचारिक पातळी असेल तर हे पुढे जाऊन कोणते राजकारण करतील?यांच्या हातून कोणते सेवाकार्य होऊ शकते? पेपरला फोटो छापून येते म्हणून काहीही विचित्र, विक्षिप्त कृती करणारी बाया माणसे खरेच राजकीय कार्यकर्ते ,नेते म्हणायचे का? उठसूठ या कार्यक्रमात भाग घेणारे तेच ते चेहरे दिसतात.आधिकतम बाया आणि टारगट पोरं.यांना महिला आणि मुले म्हणणे योग्य वाटत नाही.हे शिवसेनेचे नगरसेवक बनले तर?हे राष्ट्रवादी चे नगरसेवक बनले तर?हे भाजपचे , कांग्रेस चे नगरसेवक बनले तर?हे मनसेचे नगरसेवक बनले तर? शंका येते,खरेच सेवाभावी असतील का? माझ्या जळगाव शहरातील महानगरपालिकेत आधिकतम अशीच गुंड , गुन्हेगार नगरसेवक जास्त आहेत.म्हणून महानगरपालिका चोरांचा,गुंडांचा,गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे.येथून रोज बातमी येते, भ्रष्टाचाराची, येथून रोज बातमी येते लांचखोरीची.येथून रोज बातमी येते हाणामारीची.येथून रोज बातमी येते विनयभंगाची.या कृतीला ,या संस्कृतीला ब्रेक लावण्याची नितांत गरज आहे.
शरद पवार भाषणात नेहमीच शाहू फुले आंबेडकर चा उल्लेख करतात.यशवंतराव चव्हाण यांची सभ्यता सांगतात.तर मग,हे दाखले,ही उदाहरणे भाषण , किर्तन, प्रवचन पुरतीच आहेत का?उद्धव ठाकरे आजोबांचे प्रबोधन सांगतात.वडिलांचे आंदोलन सांगतात.तर मग,ही उदाहरणे फक्त भाषण, किर्तन,प्रवचन पुरती आहेत का? शिवसेनेच्या बायांनी तर जळगाव शहरातील बळीराम पेठ मधील भाजप पक्ष कार्यालयात कोबंड्या फेकतांना भर दुपारी घोषणा दिल्यात कि,दुरी तिरी एक्का,नारायण राणे छक्का! ही कोणती संस्कृती विकसित होत आहे? शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून शिवसेना काढायची,रामाचे धनुष्यबाण चिन्ह म्हणून वापरायचे आणि प्रत्यक्षात मात्र माणसे मर्द कि छक्का याचे प्रमाणपत्र द्यायचे,हे का खटकत नाही? मी जळगाव मधील काही थोडेफार सभ्य वाटणारे शिवसैनिक लोकांना फोन वर हरकत नोंदवली.पण कोणतीही कारवाई झाली नाही.उद्धव ठाकरेंनी याचा निषेध तर केलाच पाहिजे, शिवाय अशा असंस्कृत बाया पोरांना पक्षातून हाकलले पाहिजे.या घाण मुळे शिवसेना बदनाम होत असल्याचे भान एकाही नेत्याने दाखवले नाही.प्रसिद्धी मिळावी म्हणून विकृती करण्याची स्पर्धा जळगाव मधे, महाराष्ट्र मधे सुरू आहे.जळगांव जिल्ह्यातील खडसे आणि महाजन यांच्यात होणाऱ्या लाथाड्या ,कुटाळ्या,विटाळ्या तर राजकीय सीमा उल्लंघन करुन होत आहेत.तरीही बरे, कि दोघे शामाप्रसाद मुखर्जी ,दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी,मोहन भागवत यांच्या शाळेतील विद्यार्थी आहेत.पक्ष फुगवण्यासाठी डोक्यात हवा गेलेली माणसे सोबत घेतली तर फुगलेला पक्ष वर गेला कि फुग्यासारखा फुटतो.
महाराष्ट्रातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होत आहे.जिल्हा बॅंकेत भ्रष्टाचार.दूध फेडरेशन मधे भ्रष्टाचार.नगरपालिकांमधे भ्रष्टाचार.झेडपी मधे भ्रष्टाचार.आता तर चक्क विधासभेत आमदार खरेदी विक्री साठी उपलब्ध झाले आहेत.पन्नास आमदार विधानसभा सोडून,गोवाहाटी पळून गेले.परत आले तर विरोधात उरलेल्या आमदारांनी पन्नास खोके,सबकुछ ओके ,अशी बैनर , बोर्ड दाखवून निदर्शने केली.ती ही विधानसभेच्या पायरीवर बसून.तरीही एकाही पोलिसाने किंवा न्यायाधिशाने याची दखल घेतली नाही.कायदेमंडळात एकमेकांवर दृश्य स्वरूपात विधायक आरोप करीत असतील तर त्याची कायदेशीर नोंद घेतलीच पाहिजे.यासाठी स्थानिक पोलीस, न्यायाधीश, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, राज्यपाल, प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे जबाबदार आहेत.पण यापैकी कोणालाही देशभक्ती आठवली नाही.कोणालाही लोकशाही आठवली नाही.कोणत्याही अनपेक्षित घटनेची सामान्य माणसानेच तक्रार केली पाहिजे का? तर मग,हे अधिकारी, न्यायाधीश, राजकीय नेते यांची जबाबदारी नाही काय?हे भारताचे जबाबदार नागरिक नाहीत काय?
जळगाव जिल्हा कोर्टासमोरचा रस्ता मागील दहा वर्षांपासून उखडलेला होता.गटारीचे पाणी रस्त्यावर वाहात होते.तेथून डॉक्टर, प्रोफेसर, वकील, पोलिस, न्यायाधीश, आमदार, नगरसेवक यांची वाहने रोज वापरतात.तरीही कोणीही याची दखल घेतली नाही.कोणालाही हे खटकले नाही.जो तो आपापल्या तोऱ्यात येत जात होता.स्वताचे स्टेटस सांभाळत होता.ही मानसिकता चांगली नाही.असे अधिकारी,असे पदाधिकारी हे सन्माननीय वाटत नाहीत.मी ,माझी नोकरी,माझा पगार,माझी गाडी ,माझी साडी,माझी माडी याच नादात उच्चशिक्षित व उच्चपदस्थ नागरिक असतील तर समाजाचे,शासनाचे,प्रशासनाचे हे चांगले लक्षण नाही.
याच कोर्टातील एक वकील एड.संजयसींग आर पाटील यांनी जळगाव जिल्हा जागृत जनमंच च्या टिमला आग्रह केला कि ,हा प्रश्न तुम्ही हाती घ्या.आम्ही तेथे जाऊन त्याचे फोटो, व्हिडिओ घेतले.तेंव्हा सुद्धा दुसरा वकील सोबत उभे राहाण्याचे धाडस केले नाही.इतरांचे तर न सांगणे बरे.कैमेराने तर तेथील परिस्थिती टिपली.पण मी त्या माणसांची मनस्थिती टिपली.चेहऱ्यावर अहंभाव होता.मी का करू हे काम?माझा काय संबंध? मी येथे सोबत उभा राहिलो तर माझी डिग्नीटी डाऊन होऊ शकते.मला वाटते डिग्नीटी डाऊन होईल न होईल पण मेन्टॅलिटी मात्र डाऊन झालेली आहे.अशा जबाबदार लोकांनी पाठ फिरवल्यामुळे बेजबाबदार लोकांनी लोकशाहीवर, नगरपालिकेवर,विधानसभेवर,लोकसभेवर कब्जा केलेला आहे.त्याचेच दुष्परिणाम रोज पाहायला मिळतात,वाचायला मिळतात.याला जबाबदार फक्त " तो " नाही, " मी " सुद्धा आहेच.याची जाणिव झाली पाहिजे.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या