*बहिणी बंधू चुलता कृष्ण*
*माझा।।*
भगवान श्रीकृष्ण माझे माताश्री
आणि पिताश्री आहेत......
तेच माझ्या भगिनी आहेत आणि
बंधूराजही आहेत.....
माझे काकासुध्दा आहेत।......
ते माझे सर्वश्रेष्ठ सद्गुरु आहेत......
या भवसागरातून तारणारी तीच
माझी खरी नौका आहे........
माझ्या मनाचे खरे स्वरूप
म्हणजे कृष्ण आहे......
माझे लोकही कृष्णरूप आहेत......
ते माझे सोयरे आहेत.....
ते माझे सज्जनरूपी मित्र
आहेत......
तुकाराम महाराज म्हणतात,
श्रीकृष्ण हे माझे परमविश्रांतीचे
आणि शांतीचे ठिकाण आहे......
त्यामुळे या सर्वेश्वर श्रीकृष्णाला
जीवाहून कधी वेगळे करावे,असे
मला वाटत नाही......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी* 🌸


0 टिप्पण्या