Ticker

6/recent/ticker-posts

मिड टर्म अचीवमेंट सर्वे (एमटीएएस) यशस्वीरित्या संपन्न

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

यवतमाळ: एनसीईआरटी व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 93 शाळेतील इयत्ता तिसरीचे 50 वर्ग व इयत्ता पाचवी चे 47 वर्ग असे एकूण 97
वर्गामध्ये मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. यावेळी सदर सर्वेक्षण चाचणीला राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षक प्रा.
सरबजीत कौर चंदिगड, प्रा. थिनलेस वांगलू लदाख, डॉ. एस एस सावंत सहाय्यक आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ यांनी भेटी दिल्या. 

 इयत्ता तिसरीतील 1088. तर इयत्ता पाचवीतील 1036 विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण चाचणीत सहभाग नोंदविला. सदर चाचणी परीक्षेकरिता इयत्ता तिसरी व पाचवी मिळून एकूण 97 व राखीव 15 असे 112 क्षेत्रीय अन्वेषक यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक नियंत्रक अधिकारी यांची नियुक्त करण्यात आले होती.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य परीक्षा नियंत्रक प्रशांत थोरात यांचे मार्गदर्शनात परीक्षेचे कार्यान्वयन करण्यात आले. शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद सूर्यवंशी , प्राचार्य डायेट डॉ. प्रशांत गावंडे , डॉ. रमेश राऊत जिल्हा समन्वयक 
व उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आवश्यक नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या