Ticker

6/recent/ticker-posts

जुनोनीत भारतीय संविधानाचा जागर...!

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256

उस्मानाबाद :  -26 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 07.30 वाजता मौजे जुनोनी येथील भिमनगरातील मिलिंद बुध्दविहारामध्ये संविधानाच्या औचित्याने भारतीय संविधान एक जीवन पध्दती या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष,दत्ताञय जालिंदर सरवदे तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लेखक,विजय अशोक बनसोडे यांची  उपस्थिती होती.तसेच मुकेश मोठे,शहाजी खंडागळे,सुनिल खंडागळे,जयसिंग सरवदे यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती.यावेळी उपस्थिती मान्यवराच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.या मंगल प्रसंगी,कालकथित दगडु बळीराम सरवदे यांच्या स्मरनार्थ सौ.माधवी शाम सरवदे व शाम गोरोबा सरवदे यांच्या कडुन मिलिंद विहारात बुध्दवंदणेसाठी स्पीकर सेट भेट देण्यात आला.या नंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजय बनसोडे यांनी उपस्थितांना पंचशिलाच्या महत्वाविषयी आणि मुलभूत अधिकारासंबधी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन धम्मदिप सरवदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाम गोरोबा सरवदे यांनी मानले.संविधान दिनाच्या  या कार्यक्रमास दादा जानराव,दशरथ सरवदे,अनंत सोनवणे,प्रशांत सोनवणे,स्वप्नील सोनवणे,सौरभ सरवदे,सुशांत सरवदे,रामेश्वर सोनवणे,
मारूती सरवदे,बालाजी सोनवणे,प्रदीप सरवदे,
धम्मदिप सरवदे,नरेश सोनवणे,ज्ञानेश्वर खंडागळे,
धनाजी खंडागळे,नाना सरवदे,भास्कर कांबळे,
अविनाश सरवदे,समाधान गायकवाड,
संतोष खंडागळे,साधु सरवदे,सागर खंडागळे यांच्यासह बहुसंख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या