कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा:- आठवडी बाजार आटोपून महामार्ग क्रमांक ५३ ने गावाकडे परत जात असताना खैरी फाट्याजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात ट्रक च्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात भर्ती केले असता वैद्यकिय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले. मृतकाचे नाव तुळशीराम गणपत शिवणकर(६६) रा. पिंपळगाव/टोली, तालुका लाखनी असे आहे.
मृतक आठवडी बाजारासाठी गेला होता. परतीचे प्रवासात खैरी फाट्याजवळून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला घटनास्थळावर उपस्थितांनी अपघाताची माहिती त्याचे कुटुंबियांना दिली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने त्याला तपासून मृत घोषित केले व मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता. मन: मिळाऊ तुळशीराम च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सपोनि संजय कोरचे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत वाहनाचा शोध लागला नसल्यामुळे चालकास अटक केली गेली नव्हती.


0 टिप्पण्या