मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- ,दि.26, नोव्हेंबर उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे भारतीय संविधान दिनाच्या आवश्यक त्याने संविधान जागर समितीच्या वतीने सकाळी 09.30 वाजता,संविधान दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेखक,विजय अशोक बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव सोमनाथ नागटिळक,वंचितचे युनूस पटेल,उमाजी गायकवाड,दादा गायकवाड,ग्रामसेवक मैंदाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमापूजन व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय संविधान दिनाच्या अवचित त्यांना उपस्थित नागरिकांना पाहुण्यांनी समायोचित मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विजय अशोक बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,भारतीय संविधानाचं जाणीव जागृती व प्रसार प्रसार करणे अत्यंत गरजेची बाब आहे.कारण भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार हे भारतीयांची जीवन आचरण पद्धती आहे.हे भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे.तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्तीचे संवर्धन करते, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संविधान ग्रुप आळणीचे सुनील कांबळे, युवराज पौळ,अक्षय कदम समाधान कदम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जयराम पौळ यांनी मानले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच याप्रसंगी पोतराजा सारख्या प्रथेतुन बाहेर पडलेल्या सुनिल कांबळे आणि सुज्ञ पालक म्हणुन पांडुरंग पौळ यांचा नागरी सक्तार करण्यात आला.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन पौळ,नितीन पौळ,सोनबा पौळ,दीपक कदम,नागेश पवार,अविष्कार कदम,आकाश कदम,निलेश कांबळे,सिद्धांत कदम,शरद कदम,मनोज कदम, बाबासाहेब पौळ,अभिजीत कदम यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या