Ticker

6/recent/ticker-posts

ताडोब्यात सफारीसाठी सिरकड़ा गेटला प्रतिसाद


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

 चंद्रपूर :-आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे . ताडोबा सफारीसाठी सिरकडा गेटवर दिवसेदिवस पर्यटनाची गर्दी वाढतच चाललेली आहे . कोरोनामध्ये सिरकडा गेट बंद करण्यात आला होता . कोरोनाकाळानंतर या गेटला सर्वाधिक पसंती मिळत आहे . कारण या गेटमध्ये वाघ बघायचे प्रमाण जास्त असते असा पर्यटकांचा सूर आहे . येथे कोअरला 6 तर बफरला 14 गेट आहेत . ताडोबा बफर झोनमध्ये व्याघ्र पर्यटनाला अधिक चालना मिळावी यासाठी मार्च 2019 साली सिरकडा गेट नव्याने सुरु करण्यात आला . कोअर वनक्षेत्राचा भार कमी करण्यासाठी सिरकडा , मामला आणि पांगड़ी अशी तीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनप्रशासाने घेतला होता . यासोबतच आणणी काही गेट सुरू करण्याचे नियोजन वनप्रशानसाने केले होते . या गेट मध्ये ऐश्वर्या , छोटीरानी ट 8 असे प्रसिद्ध वाघिनी आहेत आणि इतरही प्राणी आहेत . वाघिणीचे बछड़े बघण्याची उत्सुकता पर्यटकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते . एका जिप्सीतून 6 लोकांना पर्यटन सफारी करता येत असून बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते . सिरकडा गेट वर रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी 6 जिप्सी तर दुपारी 8 जिप्सीची सफारी सुरू आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या