दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
बुलढाणा:- महिनाभरापूर्वी जिल्हा पोलिस दलाची सूत्रे हाती घेतलेल्या एसपी सारंग आवाड यांनी नांदुऱ्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांची तडकाफडकी बदली केली . राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिल्ह्यात आली असताना गावंडे नेमून दिलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे दिसून आल्याने ही बदली केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे . २१ नोव्हेंबरलाच गावंडे यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली . तेव्हापासून नांदुरा पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता . दरम्यान २८ नोव्हेंबरला रात्री उशिरा आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन मध्ये आपल्या कामाची छाप सोडणारे अनिल बेहरानी यांना नांदुऱ्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती देण्या आली आहे .


0 टिप्पण्या