लिंगोजी कदम:- जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड मो:- 9689821132
नांदेड :-जिल्ह्यातील किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रतीचे पूजन तसेच संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून'संविधान दिन' साजरा करण्यात आला.
_*यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.के.बेंबरेकर हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे किनवट शिक्षण संस्थेच सदस्य तथा माजी प्राचार्य वि.मा.शिंदे तसेच बाळासाहेब भिंगोले ,उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा शेषराव माने उपस्थिती होते.*_
_*कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रनिर्माते संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर मंचावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.*_
_*कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व तदनंतर मंचावरील प्रमुख पाहुण्यांच्या मनोगत झाले. सुरुवातीला मंचावरील उपस्थित असलेले पहीले पाहुणे प्रा.षुरूषोत्तम येरडलावार यांनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी आपले मनोगत साध्या सोप्या भाषेतून समाजशास्त्राच्या दृष्टीकोणातून मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय संविधानावर भाष्य करताना संविधान उद्देशिकेचे अतिशय उत्तम रीतीने विश्लेषण केले. तद्नंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांनी केला. तसेच सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.शेषराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुलोचना मँडम यांनी मानले.*_
_*या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.*_


0 टिप्पण्या