Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पदी रमेश गायकवाड यांची अधिकृत नियुक्ती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


मुंबई : - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते रमेश गायकवाड यांची आज अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. रिपाइं उत्तर मुंबई जिल्हा नवनियुक्त कार्यकारीणी च्या जिल्हा अध्यक्ष पदी रानेश गायकवाड; उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष पदी भाग्यराज पेरियार ; जिल्हा सरचीटणीस पदी सुनील गमरे; जिल्हा कोषाध्यक्ष पदी ओम हरिहर यादव; जिल्हा संघटन सचिव पदी अशोक कचरू कांबळे यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

रिपब्लिकन पक्षात निवडणूक प्रकिया सुरू असून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी;त्यानंतर मुंबई प्रदेश कार्यकारीणी ची निवडणूक झाल्यानंतर आता जिल्हा कार्यकारीणी ची निवडणूक घेण्यात आली असून उत्तर मुंबई जिल्हा रिपाइं निवडणूक निर्णय अधिकारी ज्येष्ठ नेते कमलेश यादव यांच्या नेतृत्वात झालेल्या रिपाइं च्या उत्तर मुंबई जिल्हा कार्यकरिणी निवडणुकीत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी रमेश गायकवाड ;कार्याध्यक्ष भाग्यराज राजू पेरियार; सरचिटणीस सुनील गमरे; कोषाध्यक्ष ओम यादव आणि संघटन सचिव पदी अशोक कांबळे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा रिपाइं चे उत्तर मुंबई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कमलेश यादव यांनी केली.त्यानुसर नियुक्ती पत्र कमलेश यादव यांनी रमेश गायकवाड यांना प्रदान केले आहे.रमेश गायकवाड यांच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्तीला आज ना.रामदास आठवले यांनी अधिकृत मान्यता दिल्याचे जाहीर केले. 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे निष्ठावन्त कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षात काम करणारे रमेश गायकवाड हे आक्रमक युवा नेते म्हणुन प्रसिद्ध आहेत. दहिसर येथील केटकीपाडा येथील रहिवासी असणारे रमेश गायकवाड यांनी मुंबईतील रिपब्लिकन युवकांचे नेतृत्व करीत रिपाइं च्या युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे. अनुभवी आणि तरुण झुंजार नेते रमेश गायकवाड यांची उत्तर मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी आणि सर्व नवनियुक्त जिल्हा कार्यकरिणीची निवड झाल्याबद्दल उत्तर मुंबईतील रिपाइं कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या