गोव्यातील खडतर स्पर्धाः राहूल पुराणीक यांचे यश
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
परभणी :-पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे रहिवाशी व परभणीचे जावाई राहुल पुराणिक यांनी अतिशय खडतर समजल्या जाणारी ऑयर्नमॅन 70.3 मैल ही स्पर्धा 7 तास 39 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण करीत ऑयर्नमॅनचा बहूमान प्राप्त केला.
गोव्यात आयोजीत केलेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑयर्नमॅन स्पर्धेत जुन्नरचे प्रतिनिधीत्व करणारे पुराणिक यांनी मोठ्या जिद्दीने व साहस दाखवून व्यावसायिक खेळाडूंच्या बरोबरीने सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालविणे आणि 21.1 किमी धावणे असे तीन प्रकार सलग 8.30 तासात पूर्ण करणे अपेक्षीत होते. या ठराविक वेळेत स्पर्धा पूर्ण करणा-या खेळाडूंना ऑयर्नमॅन या नावाने संबोधले जाते. राहूल पुराणिक यांनी उष्ण व दमट हवामानात ही स्पर्धा 7 तास 39 मिनिटात पूर्ण केली व ऑयर्नमॅनचा बहुमान प्राप्त केला.
गोव्यात दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजीत केलेल्या या स्पर्धेतील या यशाने पुराणीक हे भारावले,दैनिक दिलासाशी बोलतांना पूराणिक यांनी भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश पटकाविण्याचा मानस व्यक्त केला. या स्पर्धेत पॉवर फिक्स अॅकडमीचे कोच चैतन्य वेल्हाळ व कुटुंबियांची आपणास मोठी साथ लाभली, अशी प्रतिक्रिया पुराणीक यांनी व्यक्त केली.
दरम्यान, परभणीतील प्रसिध्द टाकळकर ध्वनी सेवेचे संचालक आबा टाकळकर यांचे राहुल पुराणीक हे जावाई आहेत.


0 टिप्पण्या