द्रोणाचार्य कोळी
जिल्हा प्रतिनिधी लातूर ग्रामीण
9822041174
लातूर: गुरूवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आशिर्वादाने अ.भा.छावा संघटनेच्या वतीने निलंगा तालूका आढावा बैठक व तालूका कार्यकारिणी निवड करण्यात आली . केन्द्रीय अध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील, व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.विजयकुमार घाडगे, यांच्या सूचनेनूसार कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. तालुका उपाध्यक्ष पदी हनुमान पाटील , वि.आ.शहराध्यक्ष पदी ओमकार सुर्यवंशी,तालुका संपर्क प्रमुख पदी शुभम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र निलंगा तालुका अध्यक्ष मा.श्री.दास भैय्या साळुंके, वि.आ.जिल्हाध्यक्ष.श्री.किरण पाटील, वि.आ.तालुका अध्यक्ष वैभव गोमसाळे,वि.आ.तालुका उपाध्यक्ष आदित्य धुमाळ यांच्या हस्ते देण्यात आले.व यावेळी सोमनाथ तूरे, प्रदीप सूर्यवंशी,प्रभाकर तेलंगे,व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या या निवडीबदल छावासह इतर समविचारी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकत्यांनी अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या