Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची बातमी अफवाच…पत्नी वृषाली गोखले यांनी दिली माहिती…


मुंबई-:  कालपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर सर्रास पसरवली जात आहे तर अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते सध्या व्हेंटिलेटर असून डॉक्टर प्रकृतीची काळजी घेत आहे. अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.

“बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या