सरगम शाहारे विशेष प्रतिनिधी गोंदिया जिल्हा मो.9158172958
गोंदिया:-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेबंर 1949 रोजी भारतीय संविधान देशाला अर्पण केली.तेव्हा पासून 26नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.
त्याचं अनुषंगाने आज दि.26/11/2022 शनिवारला सायंकाळी 6.00 वा प्रशिक बौद्ध विहार नवेगावबांध येथे नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष -रेवचंद शहारे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, सचिव -देवदास बडोले यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाजाचे माजी अध्यक्ष -भाष्कर बडोले यांच्या हस्ते भारतीय संविधानचे पुजन करण्यात आले.युवा सामाजिक कार्यकर्ते -सरगम शाहारे यांच्या हस्ते भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. संजीव बडोले पत्रकार, जगदिश शाहारे,माजी ग्रा.प . सदस्या शितल राऊत , इ.प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन व आभार समता सैनिक दलाचे प्रमुख -हेंमचद लाडे .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.


0 टिप्पण्या