कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा:- निवडणूक आयोगाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केली असल्यामुळे आदर्श आचार संहिता सुरू आहे. साकोली विधान सभा मतदार संघातील ३ तालुक्यात १४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांनी खेळीमेळीचे वातावरणात ग्रामपंचायतीची अविरोध निवडनुक केल्यास त्या गावाला विकास कामांकरिता २५ लाखाचा निधी उपलब्ध करण्यात येईल. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच काहींचे व्यवसायही बुडाले. अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. आजची निवडणूक पद्घती खर्चिक असून ग्रामीण परिसरात एकमेकाचे विरोधात निवडणूक लढविण्याने पराभूत उमेदवार किंवा पॅनल मध्ये हाणामारीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या प्रकाराने गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. तसेच गटबाजीमुळे विकासकामेही प्रभावित होतात. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होणे आवश्यक असल्याचे आमदार नाना पटोले यांनी सांगितले.
साकोली विधानसभा क्षेत्रात मुदत संपणाऱ्या लाखनी ५१, साकोली ४१ आणि लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायती अशा एकूण १४३ ग्रामपंचायतीच्या १८ डिसेंबर ला निवडणुका होणार आहेत. ह्या गावाने एकोप्याने ग्रामपंचायत निवडणुका अविरोध केल्या. अशा सर्वच ग्रामपंचायतींना गावात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी अथवा गावचे गरजेनुसार विकास कामांकरिता ग्रामपंचायतीस २५ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध केला जाईल. असे काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश(हेमंत) कोरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. शफी लद्धानी, लाखनी तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, पंचायत समिती सदस्य विकास वासनिक, सुनील बांते, ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर, धम्मा रामटेके उपस्थित होते.


0 टिप्पण्या