:द्रोणाचार्य कोळी
जिल्हा प्रतिनिधी लातूर ग्रामीण
9822041174
लातूर: निलंगा येथील लालबहादूर शास्त्री मिशन द्वारा संचालित कै. विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महविद्यालयातील विद्यार्थी विश्वजीत जाधव यांची कुस्ती फ्रिस्टारेल 19वर्षाखालील स्पर्धेत 65किलो वजन गटात जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष पंडितराव धुमाळ व संस्थेचे सचिव प्रतिभाताई धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बी. ए. लामतूरे, प्राध्यापक जे. आय. पटेल, आणि सर्व प्राध्यापक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.


0 टिप्पण्या