दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
अकोला :- राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीत एकूण ५ हजार ९ ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . या सरपंचाच्या २६६ पदांसाठी एक हजार ३२६ तर सदस्यच्या २ हजार ७४ जागांसाठी ४ हजार ६६० अर्ज प्राप्त झाले आहेत . आता सरपंच पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून कोण क्षमतावान उमेदवार आहे , याची चाचपणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे . यंदा जिल्हा परिषद , पंचायत समित्यांवर वर्चस्व असलेली वंचित बहुजन आघाडी सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट पक्ष म्हणून उतरणार असल्याने रंगत वाढणार आहे . गत दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवस निर्बंध होते . तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा . पं . च्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या .


0 टिप्पण्या