चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
परभणी -:
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (दि.9 नोहेंबर) रोजी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी जिल्ह्यात 6.3 अंश किमान तापमान नोंद झाले आहे. मागील आठवडाभरापासून तापमानात घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी सोसावी लागत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात किमान तापमान 16 अंशांपर्यंत होते. मात्र, या तापमानात दररोज घट होत असून, शुक्रवारी तापमानात 6.3 अंशापर्यंत घसरण झाली. या हंगामातील नीचांकी तापमान नोंद झाले असून, जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. तापमानात घट झाल्याने जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. पहाटेच्या सुमारास थंडीचा परिणाम जास्त जाणवत असून, सकाळी 9 वाजेपर्यंत व्यवहार सुरू होत नाहीत. सायंकाळी देखील रस्त्यावरील वाहतूक लवकरच विरळ होत आहे. या हंगामात 20 नोव्हेंबरला 8.3 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच तापमान 6.3 अंश इतके खाली घसरले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.


0 टिप्पण्या