सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर : जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आज रोजी समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) भाजपा यांनी शिक्षणाचे जनक महात्मा जोतीराव फुले, शिक्षणमहर्षि कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्या निषेधार्थ समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच घोषणा देत निषेध करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड ,जमीर सय्यद , राजन समिंदर, दिपक घायतडक, सचिन
सदाफुले ,अतिश पारवे यांनी निषेध व्यक्त केले.या निषेध साठी मुस्लिम समाज व माळी समाज यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा.कन्हेरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर मा. विकीभाऊ सदाफुले (सामाजीक कार्यकर्ते), मा.निखिल घायतडक (माजी नगराध्यक्ष),बापूसाहेब गायकवाड (भिमटोला ग्रुप),राजन
समिंदर,राजेंद्रतात्या सदाफुले,रवि सोनवणे,सचिन (आण्णा)सदाफुले,संदेश घायतडक,विनोद सोनवणे,प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक, सचिन(जाॅकी)सदाफुले,सुर्यकांत सदाफुले,यांच्या सह्या आहेत..
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे,आरपीआयचे बाबा
सोनवणे,जमीर सय्यद,सोमनाथ राऊत,मुकुंद घायतडक,सुर्यकांत सदाफुले,विनोद घायतडक,दिपक सदाफुले,विकीभाई गायकवाड,मनीष घायतडक,प्रतिक निकाळजे,अमोल गव्हाळे, आदी सह शेकडो भिमसैनिक उपस्थित होते..


0 टिप्पण्या