Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहले, लोकशाहीचा अधिकार दिला त्या मुळे हा चंद्रकांत पाटील मंत्री झाला, नाहीतर चंद्रकांत पाटील खर्डा चौकात भिक माघत बसला असता : रा. कॉ. पार्टी चे ता. अध्यक्ष मा. दत्तात्रय वारे...


सुजित धनवे उपसंपादक महा. राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  छत्रपती शिवाजी महाराज नको आहेत, त्यांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नको आहेत, त्यांची घटना मोडून काढायची आहे. यांना बहुजन शिकायला नको आहे म्हणून कर्मवीर अण्णा नको आहेत. त्यांना महात्मा फुलेंचा तर इतका राग आहे की या माणसाने गोरगरीब दिनदलीत  स्त्रीयांना शिक्षण दिलं आणि ही माणसं शहाणी केली त्यामुळे आपले वर्चस्व जाते की काय याची भीती या लोकांना वाटत आहे त्यामुळे त्यांनी माणसं शहाणी केली त्यांचाच इतिहास भाजप हा पक्ष पुसून काढायला पाहत आहे. त्यांचे विचार काय आहे याचा विचार बहुजनांनी यांचा विचार करणे गरजेचे आहे. बहुजनांना मोडून काढायचे भाजपचे विचार आहेत आणि याच विचारातून चंद्रकांत पाटलांसारखे वाचाळवीराकडून अशी वक्तव्य बाहेर येत आहेत. कोल्हापुरात यांना कोणी भीक घातली नाही. स्वतः भिकारी असलेल्यांना सगळे भिकारी वाटतात. मी चंद्रकांत पाटलाचा व या सरकारचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटलाचा त्वरित राजीनामा घ्यावा म्हणून उद्या ना जामखेड बंदचे आव्हान करण्यात आले आहे. जो जो आमचे महामानव व प्रेरणास्थानवरून आम्हाला डीवचण्याचा प्रयत्न करीन त्यांना आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाहीत असाही निर्वाणीचा इशारा प्रा. मधुकर राळेभात त्यांनी दिला. 
     भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क़ातिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे अवमानास्पदभाष्य केले आहे. ते अतिशय निंदनीय आहे. याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी ठीक सकाळी ११:३० वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथे निषेध सभा व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सुरेश भोसले, वैजीनाथ पोले, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रा. कुंडल राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, विकी भाऊ सदाफुले, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, सचिन शिंदे, विकास राळेभात, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, उमर कुरेशी, प्रविण उगले, मनोज भोरे, महेश निमोणकर, निखिल घायतडक, अमोल लोहकरे, वसिम सय्यद (मंडप), पवन राळेभात, अमित जाधव, दिगंबर ढवळे, बबन तुपेरे, महेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप शेटे, संभाजी राळेभात, फिरोज बागवान, दिगांबर चव्हाण, संजय डोके, गणेश हगवणे समीर पठाण, आशोक आव्हाड, बाबा सोनवणे, कबीर घायतडक, माजी सरपंच शिवाजी ससाणे, सुरेखा सदाफुले, बबलू तुपेरे, सुरेखा सदाफुले, दिपक घायतडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
    राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, समस्त भिमसैनिक यांच्या वतीने उद्या बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

    यावेळी बोलताना दत्तात्रय वारे म्हणाले की, भाजपाचे काही लोक खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर टिका करतात. समाजात दुही पेटवून असंतोष निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहले, लोकशाहीचा अधिकार दिला त्या मुळे हा चंद्रकांत पाटील मंत्री झाला, नाहीतर चंद्रकांत पाटील खर्डा चौकात भिक माघत बसला असता.
    मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींचा  व चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विजयाच्या तर वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या
यावेळी चंद्रकांत पाटलाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच प्रचंड घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटलाचा निषेध करण्यात आला. 
    यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, वैजीनाथ पोले, राजेंद्र पवार, प्रा. कुंडल राळेभात, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, अमित जाधव,विकी घायतडक, सुरेखा सदाफुले, पत्रकार अजय अवसरे, प्रकाश सदाफुले, आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे, पवन राळेभात, दिगांबर ढवळे, शिवाजी ससाणे आदिंनी आपल्या तिव्र शब्दात व्यक्त केला.

पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या