Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

परभणी :- शहरातील वसमत रोडवरील शिवशक्ती परिसरात शुक्रवारी ( दि . ९ ) रोजी सांयकाळी भरधाव दुचाकीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला . याबाबत अधिक माहिती अशी की स्नेहशारदा नगरातील रहिवासी माजी शिक्षक भानुदासराव भोसले ( वय ७१ ) आपले काम आटोपून शिवशक्ती बिल्डिंगकडून वसमत रोड ओलांडत असताना अल्पवयीन मुलगी भरधाव वेगाने स्कुटी ( एम एच २२ - एवाय ९ ११० ) चालवत आली आणि तिने भोसले यांना उडवले . डोक्याला जास्त मार लागल्याने खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून उपचार सुरू केले . उपचारादरम्यान शनिवार रोजी पहाटे त्यांचे निधन झाले . कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ प्रशांत भोसले यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते रणजित कारेगावकर यांचे ते सासरे होत . त्यांच्या पश्चात तीन मुली , एक मुलगा , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे . खानापूर येथील स्मशानभूमीत शनिवार रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या