Ticker

6/recent/ticker-posts

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा - वंचित बहुजन आघाडी


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातुन अनुयायी चैत्यभुमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना होणाऱ्या गैरसोयी आणि महानगरपालिकेकडुन अपुऱ्या सुविधा पुरविल्याचे आढळून आल्याने सर्व बाबींचे पुरावे घेऊन वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संबंधित अधिकारी यांना 23 नोव्हेबर 2022 रोजी भेटुन काही सुचना तसेच मागण्या करण्यात आल्या होत्या.

सदर गोष्टीचा पाठपुरावा वंचितच्या माध्यमातून सातत्याने चालू होता. या पाठपुराव्याच्य फलित म्हणजे सहाय्यक अभियंता व अधिकारी यांनी वंचितच्या सर्व सूचनांची गांभीर्याने दखल घेत आज दि 2 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचारी यांना महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या अनुयायांनी गैरसोय होऊ नये यासाठी स्पष्ट आदेश दिले.

तसेच सर्व अधिकारी संस्था व कंत्राटदार यांचे संपर्क देऊन वंचित बहुजन आघाडीच्या स्वयंसेवकांशी समन्वय साधून काम करूया असे आश्वासन दिले. यावेळी कमलेश उबाळे,अरविंद धुतराज व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या