रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई : - आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत महायुती करून लढण्याचा निर्णय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीत ठराव करून घेण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली.मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथील सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कमिटी ची बैठक आज झाली.त्यात ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंत राव गायकवाड; राज्य युवक अध्यक्ष पप्पू कागदे;महिला राष्ट्रीय सरचिटणीस ऍड आशाताई लांडगे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपाइं च्या राज्य कमिटी च्या वैठकीत ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याना आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. राज्यातील अनुसूचित जाती साठी राखीव 29 जागा पैकी काही जागा निवडून त्या जागा रिपाइं ला मिळेल त्या चिन्हावर लढण्यासाठी तयारी करा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले असून या सरकार च्या विस्तारत रिपाइं ला एक मंत्रिपद आणि महामंडळ सदस्य पदे रिपाइं ला मिळावीत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण बोलणार आहोत असे ना.रामदास आठवले म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे किमान 2 हजार क्रियाशील सदस्य बनवावेत. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे किमान 1 हजार ते 2 हजार क्रियाशिल सदस्य बनवा अन्यथा रिपाइं च्या जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीला मान्यता देणार नाही. असा ईशारा ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याना दिला. रिपब्लिकन पक्षात सहकार विंग आणि उद्योग आघाडी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या रिपाइं च्या राज्य कमिटी च्या बैठकीत घेण्यात आलाअसल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली. छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्ष समाप्ती निमित्त पुढील वर्षी दि.5 आणि 6 मे रोजी कोल्हापुरात रिपाइं चे राज्याचे अधिवेशन घेणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्याना केले.


0 टिप्पण्या