दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
परभणी :- गोदावरी नदीत उडी घेऊन एका ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली . शुक्ला रमेश सोळंके ( ४५ , रा . शिर्शी बु . ता . सोनपेठ ) असे मयत महिलेचे नाव आहे . शुक्ला सोळंके यांनी दहा वाजेच्या सुमारास नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळताच सोनपेठ पोलिस ठाण्याचे सपोनि . संदीप बोरकर , पोउपनि विष्णू गिरी , प्रभाकर बाजगीर , गणेश नाटकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनपेठ व गंगाखेड येथील अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला . त्यानंतर सदरील मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे . पुढील तपास पोलिस करीत आहेत .


0 टिप्पण्या