दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
जालना :- घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे एक इसम सार्वजनीक ठिकाणी कल्याण मटका नावचा जुगार खेळ खेळत व खेळवित आहे अशी माहीती पोलीस निरीक्षक सानप यांना मिळाली होती . पोलीस निरीक्षक सानप यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी दि 02 वार शुक्रवार रोजी छापा मारून कारवाई करुन इसम एकनाथ शाहुजी कोळे वय 42 वर्ष रा . तिर्थपुरी ता . घनसांवगी जि . जालना यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम असा 540 रु व साहित्य जुगार मुद्देमाल जप्त केला आहे . वरील नमुद इसमाविरुदध पोलीस हेडकेन्स्टेब माळी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 470/2022 कलम 12 अ मटका जुगार कायद्या प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे .


0 टिप्पण्या