Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येथे ग्राहक मेळावा


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

वाशिम :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वाशिम अर्बन को . ऑप . बँकेच्यावतीने काळाची गरज ओळखून ग्राहकांच्या हितासाठी अत्यंत वाजवी दरात सोलर उर्जा ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे . सदर योजनेबाबत संपूर्ण माहिती व उद्दिष्ट संदर्भात वाशिम शाखेत सर्व शाखेतील शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली . सदर कार्यशाळेला भव्य प्रतिसाद मिळाला . सदर कार्यशाळेचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम चरखा यांचे हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले . यावेळी मंचावर वाशिम शाखेचे शाखा सभापती नितीन करवा , मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल , शाखा समिती सदस्य निलेश सोमाणी , आसाराम जायभाये , सोलरचे गोपाल मुंदडा , उमेश सोमाणी आदींची उपस्थिती होती . यावेळी सोलर योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली . सोलर लावा वीज विसरा असा आवाज बुलंद करीत या सोलर योजनेअंतर्गत ग्राहकांना बँकेच्यावतीने सर्व शाखेतून कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येत असून , शासकीय अनुदान , अत्यल्प व्याजदर व एजन्सीमार्फत सौर उर्जा यंत्र उभारणी करण्यात येणार असून , त्यामुळे वेळेची , पैशाची बचत होवून निसर्गाच्या उर्जेमधून वीजनिर्मिती मिळणार आहे . सदर योजनेचा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष पुरुषोत्तम चरखा यांनी केले . बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई राठी यांनी ऑनलाईन द्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने पुढाकार घेण्याचे आवाहन केले . यावेळी शाखाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांचे समाधान करण्यात आले . सदर योजनेबाबत गोपाल मुंदडा व उमेश सोमाणी यांनी विस्तृत माहिती दिली . सदर कार्यशाळेत निलेश सोमाणी , नितीन करवा यांनी आपले मनोगत व्यत केले . कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक सरव्यवस्थापक श्रीराम करवा , आभार शाखाधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी मानले . सदर योजनेबाबत 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाशिम अर्बन बँकेच्या शाखेत भव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . या मेळाव्यामध्ये बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई राठी , उपाध्यक्ष पुरुषोत्तम चरखा , महावितरण एमएससीबीचे अधिकारी , बँकेचे संचालक व मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत . सदर ग्राहक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही बँकेच्यावतीने करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या