दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
परभणी :-सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील रहिवाशी तथा सध्या ठाणे येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर कार्यरत असलेले पद्माकर उर्फ धनंजय काशिनाथराव धोंडगे यांची मुंबई मंत्रालयातील विधी व न्याय विभागात अवर सचिव ( विधी ) या पदावर निवड झाली आहे . इ . स . २०१७ मध्ये पद्माकर धोंडगे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदावर नेमणूक झाली होती . दरम्यान , लोहा येथून डेपोटेशनवर त्यांची ठाणे येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली . दरम्यान , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीनुसार अवर सचिव विधी या पदासाठी दि . १८ ऑक्टोबर रोजी मुलाखती घेण्यात आल्या . श्री . धोंडगे हेही या मुलाखतीला सामोरे गेले होते . त्याचा निकाल दि . ८ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे . यामध्ये धोंडगे यांनी अव्वल स्थान ( पहिला क्रमांक ) पटकावले असून त्यांची मुंबई मंत्रालयातील विधी व न्याय विभागात अवर सचिव ( विधी ) या पदावर निवड झाली आहे . धोंडगे यांनी अत्यंत मेहनतीतून हे यश मिळवून स्वत : सह गावाच्या लौकिकात मोठी भर घातली आहे . या निवडीबद्दल आवलगाव येथे धोंडगे यांचा शुक्रवारी संध्याकाळी हनुमान मंदिरासमोर एका कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला . धोंडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .


0 टिप्पण्या