Ticker

6/recent/ticker-posts

सातरगाव येथे एकास मारहाण , गुन्हा दाखल समर्थ


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

अकोला :-दारू पिणाऱ्या व्यक्तीला रस्त्यातून बाजूला सरकण्यासाठी म्हटले असता , लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बाळापूर तालुक्यातील ग्राम सातरगाव घडली असून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . रुस्तम ज्ञानदेव वाकोडे ( ३६ ) राहणार सातरगाव पाणी भरण्यासाठी मोटरसायकलने जात असताना वाटेत संजय भीमराव इंगळे हा व्यक्ती दारू पिऊन होता . त्याला बाजूला सरकण्यासाठी सांगितले असता , लाकडी काठीने मारहाण केली . या प्रकरणी बाळापू पोलिसांनी संजय इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या