Ticker

6/recent/ticker-posts

झरप येथे सामूहिक हवन व सेवक संमेलन उद्या

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ झरप, कोलारा, डोंगरगाव/साक्षर चे वतीने ११ डिसेंबर २०२२ रोज रविवार ला झरप येथे सामाजिक हवन कार्य व सेवक संमेलनाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी अवजड उद्योग मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, विशेष अतिथी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी देविदास टेकाम, प्रमुख अतिथी विधान परिषद सदस्य आमदार परिणय फुके, भाजपा महामंत्री अजय तुमसरे, खासदार सुनील मेंढे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, भंडारा चे आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार सेवक वाघाये, राजेश काशिवार, जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगूळे, अविनाश ब्राह्मणकर, वनिता डोये, सरिता कापसे, माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे, उमराव आठोळे, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री गीलोरकर, पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, किन्ही चे माजी सरपंच शेषराव पंधरे, झरप ग्रामपंचायत पदाधिकारी व कमिटी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था झरप आणि तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी व सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यात विशेष कामगिरी करणाऱ्या सेवकांचा सत्कार व गौरव पुरस्कार तसेच सामूहिक हवन, शोभा यात्रा, झाकी व लेझीम तसेच मानव जागृती अंधश्रद्धा निर्मूलन, सहभोजन, भजनाचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री १०:०० वाजता "जीवन व्यथा" ह्या ३ अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ झरप, कोलारा डोंगरगाव/साक्षर आयोजक समितीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या