दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
रायगड :-महाड तालुक्यातील महावितरण कार्यालयामधील गलथान कारभारासह नादुरुस्त मीटर , वाढीव बिल संदर्भात आपली माती आपली माणस संघटनेचे माध्यमातून जण आंदोलन पुकारण्यात आले . त्याला यश मिळाले असून ५ गावांतील मीटर बदलण्यात आले . उर्वरीत मीटर बदलण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . तालुक्यातील नवीन डिजिटल मीटर बसविण्याची कामे सुरू असून आजपर्यंत ढवळे , खोपड , चादंके , कामथे गावातील मीटर बदल्यात आले आहेत . कार्यालयातील नवीन मीटर कमी पडल्याने आपली माती आपली माणसं संघटनेने भांडूप मुख्य कार्यालयात नवीन मिटरची मागणी केली त्यामुळे पोलादपूर कार्यालयात नवीन मिटर मिळाली आहेत . तालुक्यातील लहुळसे , देवळे , नावाळे , मोरसडे , आडावळे , बोरज , बोरावळे आदी गावात बसविण्यात येणार आहेत .


0 टिप्पण्या