Ticker

6/recent/ticker-posts

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मदतीने आपला नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार करू पाहणाऱ्या काटी, तुळजापूर येथील श्री.संजय रघुनाथ भडकवाड यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत १,००,००० रुपयांची मदत


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256


उस्मानाबाद :- धाराशिव :-दिनांक 9 डिसेंबर तुळजापूर येथील श्री.संजय हे गेल्या ३ वर्षांपासून दुसऱ्याच्या मोबाईल दुरुस्ती दुकानात काम करत होते. वर्षभरापूर्वी पैसे जमा करून स्वतःचे छोटेसे दुकान त्यांनी सुरू केले. मात्र व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा असून देखील आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नव्हते.

अशा वेळी त्यांना PMEGP योजनेची माहिती मिळाली.नतर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या
कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर कार्यालयाच्या मदतीने त्यांनी कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना १,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.

आत्मनिर्भर झालेले श्री.संजय हे प्राप्त झालेल्या पैशातून संगणक व मोबईल दुरुस्तीसाठी लागणारे आवश्यक भांडवल खरेदी करणार आहेत. यामुळे प्रति महिना १०,००० ते १५,००० रुपयांनी उत्पन्न वाढेल अशी त्यांची अपेक्षा आहे.

आत्मनिर्भर होण्यासाठी PMEGP योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसाय आपल्याला सुरू करता येतात किंवा असलेला व्यवसाय वाढवताही येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या