दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
परभणी :-योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत परभणीत 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत येथील तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिर होणार आहे, अशी माहिती पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर यांनी आज रविवारी (दि.22) दिली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी सुधाताई आलानी, उदय वाणी, अतुल आर्य, ज्योती जवाहिरे, पूनम खत्री, प्रा.अनिजीGV इतर भागातूनही अनुयायी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. हजारो लोक एकावेळी शिबीरात सहभागी होतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. 25 ते 27 फेब्रुवारी असे शिबीर होत असून तीन दिवस रोज पहाटे 5 ते 7.30 या वेळेत योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत योगासने होणार आहेत. याशिवाय दररोज सायंकाळी 5 ते 8 या वेळात भजनसंध्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीतमय योग आणि युवकांसाठी योग मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तीन दिवसीय योगशिबीरात सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत मोफत चिकित्सा करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या