Ticker

6/recent/ticker-posts

गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला

गडेगाव उड्डाणजवळील घटना

६ लाख ६०  हजाराचा मुद्देमाल जप्त

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- कत्तली च्या उद्देशाने गोवंशाची विनापरवाना वाहतूक करणारा १० चक्का ट्रक लाखनी पोलिसांनी गडेगाव जवळ मंगळवारी(ता. १७) ला पकडला. त्यात ३५  गोवंशांची निर्दयतेने वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने ओमप्रकाश मुरलीधर कावळे(३४) रा. यशोधरानगर, नागपुर, फैजान खान(३५) जाफर नगर नागपुर , फैजल आकबाणी(३२) , हितेश गभणे(२३), मयूर उर्फ मर्डर सावरकर(२४) सर्व रा. लाखनी यांच्याविरुद्ध लाखनी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
       लाखनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी  हे पेट्रोलिंग वर असताना सकाळच्या  सुमारास साकोली कडून भंडारा कडे जाणारा १० चक्का ट्रक क्रमांक एम एच ४० बीएल ३४८७ या ट्रकमधून गोवंशाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस हवालदार निलेश रामटेके, पोलिस शिपाई मिलिंद धाडवे, चालक पोलिस हवालदार आशीष निंबार्ते व चालक पोलिस शिपाई स्वप्नील कहालकर यांनी २ पोलिस गाड्यांसह  गडेगाव येथील उड्डाणपुलाजवळ दबा धरून बसले. गाडी भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून चालकास ट्रक थांबविण्यास संगितले. मात्र पोलिस इशार्‍याला न जुमानता त्याने ट्रक भरधाव वेगाने पुढे नेला लगेच त्याचा पाठलाग करून राजेगाव एमआयडीसी जवळ  थांबवून ट्रकची तपासणी केली असता त्यांत ३५ गोवंश  विनापरवाना पिडादायक एकमेकावर भरगच्च कोम्बुन निर्दयतेची वागणूक देत कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख ५९  हजाराचे ३५ गोवंश व ट्रक किंमत पाच लाख असा एकूण ६ लाख ५९  हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून गोवंशाना बरडकिन्ही येथील गोशाळेत पालन पोषणाकरिता पाठविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी आरोपीताविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यास निर्दयतेने वागविण्याचा कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या