महामार्ग पोलिस केंद्र गडेगाव चा स्तुत्य उपक्रम
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा: - रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे औचित्य साधून महामार्ग पोलिस केंद्र गडेगावद्वारा मंगळवारी(ता १७ ) औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच राणी लक्ष्मीबाई विद्यालय लाखनी येथे भेट देऊन विद्यार्थी व वैद्यार्थिनिना वाहतूक नियमाबाबद माहिती देण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या वाहन चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता वाहतूक विभागाद्वारे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवून वाहन चालक व नागरिकांत जनजागरण करून वाहतूक नियमांची माहिती दिली जाते . अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई , पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूरचे वतीने १० ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ राबविण्यात आला . अंतिम दिवशी लाखनी शहरातील राणी लक्ष्मीबाई विद्यालय तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षक व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली तसेच नंदलाल पाटील कापगते हायस्कूल साकोली व महामार्ग पोलिस केंद्र गडेगावचे संयुक्त विद्यमाने रॅली काढून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.तसेच वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे , सावरकर यांचेसह सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या