जे लोक आता शहरात आले आहेत, हरी विठ्ठलनगर, खंडेराव नगर, खोटे नगर, रामेश्वर कॉलनी,शिवाजीनगर,जैनाबाद वगैरे भागांत राहातात, त्यांना खेड्यात शेत होते.चांगली मजुरी मिळत होती.पण हे शेती विकून शहरात आले.म्हणे घरकाम करू.रीक्षा चालवू.दुकानावर काम करू.कंपनीत काम करू.पण कलेक्टर सारखे राहू.तेथे सिनेमा,बगीचा,टिव्ही असे सर्वच असते.मज्जा असते.आता इतके लोकांना शहरात अशी कामे मिळत नाहीत.शौकपाणीची सवय झाली ती जात नाही.पुढील पिढी तर जास्त शौकीन असते.शाळा,दवाखाना,घर,संडास, धान्य फुकट मिळते.काही जुने कपडे,उरलेले अन्न देतात.भीक मागितली तरीही पोट भरते.मग,काय गरज आहे कष्ट करायची? आणि असे काहीही काम मिळाले नाही,भीक ही मिळाली नाही तर काय करायचे?गॅंग बनवून चोरी करणे, हाणामारी करणे,मारायची सुपारी घेणे,वाहने जाळणे,महिलांची पर्स पळवणे, दागिने ओरबाळणे,वृद्धांची थैली हिसकावणे, मोर्चात भाड्याने जाणे अशी कामे करतात.शहरातील कोणी घर बंद करून चारपाच दिवस बाहेर गावी गेले कि घर फोडलेच समजा.आता तर दिवसा सुद्धा घर फोडतात.काही तर याच धंद्यात प्रगती करुन बॅंक, एटीएम सुद्धा फोडतात.
अशा घटनांमुळे शहर बदनाम होते.बकाल होते.कौशल्य नाही, उत्पन्न नाही.शौक तर आवरत नाही.खर्च तर करणारच.तर मग,पैसा आणणार तरी कोठून?तो असाच चोरी,शिनाजोरी करूनच.जळगांव ,धुळे,नाशीक, औरंगाबाद सारखे अचानक फुगलेली शहरे आता गुन्हेगारीचे लाहोर बनली आहेत.मुंबई सुद्धा धारावी बनली आहे.तरीही नेते गौरवाने सांगतात,आमची धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.ही झोपडपट्टी कशामुळे बनली?का वाढली? जमीनी विकून ,मौजमजा करून,ढुंगणाला हात पुसून मुळशी पॅटर्न ची ही माणसे.
कोकण आधी नंदनवन होता.तेथे सुपीक डोक्याची माणसे पैदा होत असत.महाराष्ट्र व देशाला येथूनच बुद्धीमान,लेखक, डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकील, क्रांतीकारक पुरवले जात असत.आता तेथे सुद्धा कारखाने पडलेत.जमीनी विकल्यात.काही तर हिरावून घेतल्यात.तहसिलदार ,बीडीओ यांनी कागदोपत्री हेराफेरी करुन जमीनी बिल्डर,कारखानदार यांना सोपवल्यात.एका भाऊला खाऊ पिऊ घालून चार भावांची जमीन लिहून घेतली.या पापात,दुष्कर्मात आमदार सहभागी आहेत.जमीनी गेल्याने बेरोजगार,बेकार झालेले तरूण मुंबईत येऊन दादा बनले.तर मग यांनी मुंबईत येऊन गुन्हेगारी करण्याऐवजी तहसीलदार,बीडीओ, आमदार यांनाच दोषी मानून का शिक्षा देऊ नये? सरकार कोणाचेही असो.कोणताही आमदार, मंत्री आता या शेतकरी लोकांना मदत करीत नाहीत.कोणताही पोलिस किंवा कोर्ट यांना मदत करीत नाहीत.तर आपणच आपले हक्काचे रक्षण केले पाहिजे.साताराचे क्रांतीकारक नाना पाटील यांचे सारखे प्रतीसरकार चालवले पाहिजे.शत्रूला माफी नाही.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या