जळगाव शहरातील एम जे कॉलेज ते गिरणा टाकी कडे जाणारा हा रस्ता.मागील दहा वर्षांपासून बनला नाही.कंबर ठेचत,हाडके मोडत लोक जात असत.आमदाराला शिवी हासडत असत.कोण हा नालायक आमदार? साधा रस्ता सुद्धा बनवत नाही.
आता महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे.म्हणून घाईघाईने रस्ते बनवत आहेत.त्यातून आमचे पालकमंत्री, आमदार, आयुक्त,शहर अभियंता अर्धे पैसे लाटून घेतात.चोरीचा माल समजून वाटून घेतात.असा हा रस्ता डांबरीकरण करून फक्त महिना झाला.आणि उखडू लागला.पावसाळ्यात तर टिकणारच नाही.तर मग, पुढील दहा वर्षे पुन्हा तेच दळदळ ,खळखळ.कंबरदुखी,मणक्यांचे आजार.
आम्ही नागरिक तर हर तऱ्हेने कर भरतो.त्यातूनच रस्ते बनवण्याची जबाबदारी नगरपालिका व राज्य सरकारची आहे. आम्ही कर तर भरतो पण नालायक आमदार आणि नालायक नगरसेवक निवडून देतो.त्याचा हा परिणाम अरे पण ,रस्ता चांगला पाहिजे तर आमदार चांगला पाहिजे.रस्ता चांगला पाहिजे तर नगरसेवक चांगला पाहिजे.आणि हेच चोर किंवा लाचखोर असतील तर अभियंता,आयुक्त आणि कलेक्टर काय तुमचे कल्याण करण्यासाठी नोकरी करतात का? जळगाव हून जाणारा अभियंता, आयुक्त, कलेक्टर हे कुबेर बनून जातात.या पापात आमचे नगरसेवक व आमदार सहभागी होतात.म्हणून असे रस्ते बनतात.तरीही यांना लाज वाटत नाही.कदाचित यांचा हिशोब झाला आहे कि,याच रस्तेकामातून जे कमीशन मिळेल, टक्केवारी मिळेल तेच पैसे मतदारांना वाटले कि,आपण पुन्हा निवडून येऊ. मतदारांची ही कमजोर नस यांनी ओळखली आहे.
या रस्त्याची व्हिडिओ शुटींग घेतांना एक रीक्षावाला जोरात ओरडला,हो हे नालायक माणसे आहेत.आमची खात्री झाली आहे.तर मग,एम जे कॉलेज मधील प्रोफेसर, कारकून,सिपाई यांची कधी खात्री होईल कि,आमचे आमदार आणि नगरसेवक नालायक आहेत?
शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांची अमळनेर च्या बस डेपोत सभा होती.त्यासाठी दादा कोंडके प्रमुख वक्ते होते.सिनेमावालेच ते.चोपडा येथील सभा आटोपून आपण वेळेवर अमळनेर पोहचू,असा त्यांचा अंदाज होता.पण रस्ता इतका खराब कि,दादा चक्क एक तास उशीरा आले.बाळासाहेब ठाकरे रागावले.काय दादा, तुम्ही वेळेवर आला नाहीत म्हणून श्रोते निघून गेलेत.तेंव्हा दादांनी माफी मागितली नाही.म्हणाले,कोण तो आमदार?हरामखोर! मला सापडला तर जोड्यांनी मारीन.त्याला इतकी अक्कल नाही का ,कि या रस्त्याने दादा कोंडके येणार आहेत.तर रस्ता बनवला पाहिजे होता.असे म्हणताच टाळ्यांचा कडाकडाट झाला.दादांनी सभा जिंकली.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या