Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी प्राथमिक शाळेत मैदानी स्पर्धा

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा - अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शरीरयष्टी सुदृढ राहावी याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघोरी चे वतीने गुरुवारी( ता १९)  विविध मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता १ ते ४ आणि ५ ते ७ मधील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते विजेत्यांना आर्कषक पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
     कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा जवळपास दोन शैक्षणिक सत्र बंद असल्यामुळे सर्वच शालेय उपक्रम  ठप्प पडले होते . सप्टेंबर २०२२ मध्ये शाळा सुरू झाल्याने टप्प्याटप्प्याने शालेय उपक्रमास सुरुवात झाली आहे. ४ ते ६ दिवसांवर प्रजासत्ताक दिंन येऊन ठेपला असल्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच पाल्याच्या कलाकृतीचे पालकांना दर्शन व्हावे याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघोरीचे वतीने २३ ते २५ जानेवारी दरम्यान स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे पण मैदानी खेळांची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता बटाटा दौड, दोरीवरच्या उड्या, फुगडी , लंगडी, संगीत खुर्ची , सुईधागा ,चमचागोळी ,घागर दौड ,तीन पायांची दौड , ग्लासात ओंजळीने पाणी भरणे  इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला .मुख्याध्यापक प्रमोद हटेवार यांचे मार्गदर्शनात सहायक शिक्षिका ज्योती राऊत , ललिता तागडे , निता बोरकर , मीरा वंजारी , ह्या विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या