कॉम्बो जम्बो गॅदरिंगचा भव्य प्रयोग यशस्वी............
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रह्मगव्हाण व जिल्हा.परिषद.प्राथमिक शाळा नदीकाठवस्ती ब्रम्हगव्हाण या दोन्ही छोट्या शाळांचा एकत्रित २ रा वार्षिक कलाविष्कार सोहळा कार्यक्रम दि.२० जानेवारी रोजी रात्री ७ ते १०:३० या वेळेत अत्यंत आकर्षक व कलात्मकतेने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. औरंगाबाद चे माजी.अर्थ व बांधकाम सभापती विलासबापू भूमरे यांच्या हस्ते व पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आवघ्या ३० पटांच्या या दोन्ही शाळेत मोठा सांस्कृतिक कार्यक्रम स्वतंत्रपणे मोठ्या स्वरूपात घेता येत नसल्याने, याहीवर्षी या दोन्ही शाळांनी एकत्रित कार्यक्रम घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना मोठा मंच उपलब्ध होऊन कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने हा अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 'विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे' मत मा.विलासबापू भूमरे यांनी व्यक्त केले. तसेच पालकमंत्री संदीपान पा. भूमरे यांच्या माध्यमातून दोन्ही शाळांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील बापूंनी दिली.
मराठी बालगीते, सिनेमांतील गीते, नाटीका, पाठ्यपुस्तकातील कविता, महापुरुषांवरील गीते असे निरनिराळे भरगच्च कार्यक्रम यावेळी ग्रामस्थांसमोर विद्यार्थ्यांनी सादर केले. ग्रामस्थांकडुन विद्यार्थ्यांवर कलागुणांचे कौतुक करत तब्बल ४४,००० रूपयांचे बक्षिसांचा वर्षाव झाला. शहरातील इंग्रजी शाळांनाही लाजवेल इतकी रोषणाई, रंगमंचाची भव्यता व कलात्मकता, प्रेक्षकांसाठीही शेकडो खुर्च्या, भव्य सजावट व स्वागतासाठीच्या रांगोळ्या यामुळे उपस्थित भारावून गेले होते.
_या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी जितेंद्र सोरटे, डॉन बॉस्को सामाजिक संस्थेचे ब्रदर अलेक्स घोंसालविस, चितेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य अक्षयभैय्या जायभाये, जवाहर कॉलनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सिताराम केदारे साहेब, से.नि.केंद्रप्रमुख साळवे सर, लोहगावचे लाडके केंद्रप्रमुख मनोजकुमार सरग सर, दावरवाडीचे केंद्रप्रमुख राम तांगडे सर, ढोरकीनचे केंद्रप्रमुख संतोषजी पवार सर, आयसीआयसीआय फाउंडेशनचे नामदेव बिजुले सर, डॉन बॉस्को संस्थेचे विजय गायकवाड सर व अमोल जऱ्हाड सर, पंचक्रोशीतील सर्व सरपंच किरण भाऊ केदारे ,ज्ञानेश्वर विठ्ठलआण्णा शिंदे, सतीशभाऊ शेळके, गणेश इथापे, शिवाजीराव कणसे, संजयभाऊ गरड, दिलीपनाना जगताप, नितीनराव एरंडे, दत्तूकाका मालकर, शिक्षक सेना तालुका प्रमुख अमोलराजे एरंडे, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा नेते शिवाजीराव एरंडे, सोमीनाथ रासकर, अशोकराव शिंदे, रमेशभाऊ वाघमारे, मुप्टा शिक्षक संघटनेचे बबनराव वाकळे, धनंजय साखरे, शिक्षक सेना वस्तीशाळा आघाडीचे याकूबभाई पठाण, केंद्रातील मुख्याध्यापक एकनाथ लाटे, कृष्णाजी जगताप, सतीश सावंत, वैशालीताई राठोड, शिक्षक सेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सुनीताताई दरे, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग गोर्डे, तालुका नेते श्रीकांत गोर्डे, सुरज खुरुद, जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचे तालुका समन्वयक आजिनाथ दहिफळे, सहसमन्वयक श्रीकांत कराड, प्रवीण फटांगडे, किशोर तोतरे, ईश्वर खंदारे, सुहास शिंदे, विक्रम खाडे, तोंडोळी शाळेचे मदन उबाळे सर, योगीराज खोब्रागडे सर, दत्ता कळसकर सर, लोहगाव प्रशालेचे भागवत गुठे सर, सुभाष गोरे सर ,अविनाश टकले सर, शेवता शाळेचे संतोष केकते सर, संभाजीराजे शिंदे सर, दिलीप सोनवणे सर, विजय आवारे सर, तारूपिंपळवाडी शाळेचे अशोक पाटील सर, रवी लाटे सर, बोरगावचे मुख्याध्यापक रमेश हिवराळे सर, मित्रवर्य अविदादा आडसरे सर, यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,विविध क्षेत्रातील पदाधिकारी, केंद्रातील बहुतांश शिक्षकांसह तालुकाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपस्थितांचे बुके देउन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कैलास मिसाळ,महेश लबडे, शिक्षक रवी केदारे, गजानन डुकरे यांच्यासह पैठण तालुका शिक्षक सेना, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व गावातील स्वयंसेवक युवा वर्ग यांनी कष्ट घेतले.


0 टिप्पण्या