Ticker

6/recent/ticker-posts

लाकडी दांड्याच्या मारहाणीत १ गंभीर जखमी


 पोहरा येथील घटना 

लाखनी पोलिसांनी ४ इसमांवर केला गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा - कोंडा खरेदी विक्रीच्या व्यवसायावरून संगनमताने शिवीगाळ व भांडण करून लाकडी दांड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार (ता २० ) सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान घडली . जखमीचे नाव आशिफ यासिन आकबानी(२५) असून लाखनी पोलिसांनी जावेद आबिद छव्वारे (३६) , इमरान आबिद छव्वारे (३२) , शादाब शाकिर छव्वारे(२२) , सोहेल सकील छव्वारे (३०) सर्व राहणार पोहरा यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे . 
    आसिफ आकबानी यांचा कोंडा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते गणेश आग्रो इंडस्ट्री कंपनी अर्जुनी /मोरगाव येथे कोंडा खरेदी करण्यासाठी गेला असता जावेद छव्वारे याने फोन करून कंपनी मे क्यू गया था वहा मेरे अलावा कोई जाता नहीं औंर तू इसके बाद जाना नही असे बोलून शिवीगाळ व भांडण करून तू घर पे रुक मैं आकर बताता हू असे बोलून धमकी दिली तथा यातील आरोपितांनी संगनमत करुन पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीने आसिफ आकबानी यांचे घरासमोर जाऊन त्यांना व वडील यासिन गफ्फार आकबानी यांचेसोबत ढकलढुकल करून थापड बुक्क्यांने मारहाण केली तर इमरान छव्वारे याने लाकडी दांड्याने आसिफ आकबानी यांचे डोक्यावर लाकडी दांड्याने मारून गंभीर जखमी केले तसेच त्यांचे वडील भांडण सोडविण्यास आले असता त्यांना शिवीगाळ करून जमिनीवर पाडून हातबुक्क्यांनी पायावर व हातावर मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जखमीचे फिर्यादीवरून तसेच. वैद्यकीय अहवालावरून ४  इसमांविरुद्ध  लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ११/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम ३२६ , ३२३,५०४,५०६, ३४भादवी अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.जखमीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून वृत्त लीहीपर्यंत आरोपींना अटक केली गेली नव्हती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या