बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची मालिका सुरूच............
प्रियसीची छेड काढण्याच्या कारणावरुन दारू पाजुन मुंडके केले धडावेगळे.............
पैठण तालुक्यातील पाडळी येथील घटना, मुंडके पोलिसांना सापडेना आरोपीस अटक.............
गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो8308128457
औरंगाबाद :- बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना प्रेयसीची छेड काढल्यावरुन रागातून एका तरुणाने पाडळी गावातील चाळीस वर्षे युवकाला दारू पाजुन कुर्हाडीने मुंडके छाटुन धडावेगळे केल्याची घटना पैठण तालुक्यातील पाडळी येथे दि.१९/१/२०२३ गुरुवार रोजी घडली असून शुक्रवारी मताचे शरीर पोलिसांना पाडळीगाव शिवरातील एका गायरान शेतामध्ये सापडले. परंतु मुंडके (शीर) दिवसभर शोध घेऊनही पोलिसांना सापडले नाही. पाडळी येथील संदीप संपत गायकवाड (वय ४० वर्षे) हा व्यक्ती गुरुवारी सायंकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर निघून गेला होता. शुक्रवारी सकाळी ८:०० वाजता त्याचे मुंडके छाटलेले शरीर गाव शिवारातील एका गायरान शेतामध्ये काही शेतकऱ्यांना आढळले, याबाबत बिडकीन पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जगदीश मोरे, महेश घुगे, बीट जमादार संजीवन कदम, शरद पवार, सचिन मस्के, आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ञ,श्वान पथक पाचारन करण्यात आले. काही वेळानंतर पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक रामा जाधव, वाल्मीक निकम, खांडेभराड आदी घटनास्थळी दाखल झाले शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी मयताचे मुंडके (शीर) शोधले परंतु ते सापडले नाही. यावेळी पोलीस मयताचे शरीर बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात आणत असताना त्यास मयताच्या नातेवाईकांनी विरोध केला. अगोदर आरोपींना अटक करा, मगच मृतदेह उचला असा आक्रमक पवित्र घेतला, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात आनण्यात आला रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आजिनाथ गायकवाड (वय ३० वर्षे) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहेत.
दारूपासून कुर्हाडीने छाटले मुंडके धडावेगळे...........
तपासात मयत संदीप गायकवाड हा गुरुवारी सायंकाळी गावातीलच आजिनाथ गायकवाड यांच्यासोबत होता, असे पोलिसांना समजले. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास पोलिसांनी आजिनाथ गायकवाड याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर त्याची सविस्तर चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संदीप गायकवाड यांनी त्याच्या प्रियसीची छेड काढली होती, तसेच विनयभंग केला होता. या रागातून गुरुवारी संदीप गायकवाड याला गुरुवारी सायंकाळी दारू पाजली त्यानंतर कुर्हाडीने त्याचे मुंडके (शीर) धडावेगळे केले असल्याची कबुली आजिनाथ यांनी पोलिसांना दिली. मयताचा खुन केला मात्र त्याचे मुंडके आपण लपवले नाही, किंवा अन्यत्र फेकून दिले नाही, असे आरोपीनी पोलिसांना सांगितले, मयताच्या नातेवाईकांनी मात्र अन्य काही आरोपी असल्याचा आरोप केला आहे.
खून झालेल्या व्यक्तीवर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे........
मयत संदीप गायकवाड हा परिवारासह पाडळी येथे राहत होता. त्याला सोळा वर्षाचा एक मुलगा व एक लहान मुलगा आहे. मात्र सध्यास्थितीत तो पत्नी सोबत राहत नसल्याचे समजले. त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंगाची गुन्हे दाखल असून पूर्व वैमनस्यातुन ही घटना घडली असावी असा आरोप नातेवाईक करत आहेत. पाडळी या गावात दंगा नियंत्रण पथकास पाचारन करण्यात आले आहे.......
बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत खुनाची मालीका सुरूच........
औरंगाबाद शहरापासून अगदी जवळ असलेल्या बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यात पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी एकट्या राहणार्या दोन वयोवृद्ध महिलांना चोरट्यांनी लक्ष केले होते. तसेच एका महिन्यापूर्वी फारोळा फाट्याजवळ वृध्द दापंत्याचा खून करण्यात आला असून बिडकीन परिसरात खुनाची मालीका सत्र सुरू असल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरन पसरले आहे.


0 टिप्पण्या