Ticker

6/recent/ticker-posts

बासमती राईस मिल मधून लोखंडी प्लेट ची चोरी


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी ता. गडेगाव शिवरातील स्व. निर्धनराव पाटील वाघाये बासमती राईस मिल मधून लोखंडी प्लेट ची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली याप्रकरणी संशयित ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश शालिक निंबार्ते (३०), सुनील माणिक राऊत (३२), श्रीगंद भाऊराव शहारे (२७), विशाल मधु मने (३२) सर्व रा. इंदिरानगर केसलवाडा /वाघ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेचा पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
गडेगाव शिवरातील स्व. निर्धनराव पाटील वाघाये बासमती राईस मिल मध्ये लोखंडी शेडचे काम सुरू असून अविनाश शालिक निंबार्ते , सुनील माणिक राऊत , श्रीगंद भाऊराव शहारे , विशाल मधु मने हे शेडच्या लोखंडी प्लेट कटींग च्या कामावर होते. शेडच्या कामाकरिता २१ लोखंडी प्लेट कापून ठेवण्यात आल्या होत्या. पैकी १६ लोखंडी प्लेट कमी दिसल्याने काम करणारे मजुरांनीच त्यांची चोरी केली असावी असा संशय काम पाहणारे निशिकांत वाघाये यांच्या तक्रारीवरुण लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुरेश आत्राम पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या