मांढळ चुलबंद रेतीघाटातील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा - रेतीची वाहतूक आटोपून रेतीघाटातून घराकडे जात असलेल्या धावत्या ट्रॅक्टरवर चढण्याच्या नादात पाय घसरून खाली पडलेल्या मजुराचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता २१) सकाळचे सुमारास दिघोरी/मोठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ रेतीघाटावर घडली . मृतकाचे नाव शिवराम पाईकू बरडे ( 40 ) असे आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह पसार झाला घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली .या घटनेमुळे रेतीघाटावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चुलबंद नदीतील मांढळ रेतिघाटालगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीमिश्रित रेती काढून वाहतूक करण्याचा परवाना नाशिकच्या एका कंत्राटदारास देण्यात आला आहे. काही दिवसांपासून त्या रेती उपस्यावर मांढळ गावातील 10ते 15 ट्रॅक्टर मातीमिश्रित रेती जमा करण्याच्या कामावर आहेत. वाहतूक संपवून घराकडे खाली ट्रॅक्टर नेत असतांना ट्रॅक्टरखाली येऊन शिवराम बरडे याचा मृत्यू झाल्याची घटना समजताच रेतिघाटावर २०० ते ३०० लोकांचा जमाव जमुन मृतकाच्या कुटुंबास कंत्राटदाराने आर्थिक मदत केल्याशिवाय मृतदेह उचलायचा नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती . रेतिघाटात तणावपूर्ण वातावरण असल्याची माहिती दिघोरी चे सहायक पोलीस निरीक्षक पवार यांना मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली . जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, लाखांदुर तहसीलदार वैभव पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोळस यांनी घटनास्थळी भेट देऊन जनक्षोभ शांत केला .तथा मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आला . दिघोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचा व चालक कोण होता हे वृत्त लीहिपर्यंत समजले नाही


0 टिप्पण्या