Ticker

6/recent/ticker-posts

बीएसएनएल टॉवर गावापासून ५०० मीटर अंतरावर करावे


तमुस अध्यक्षाचे तहसीलदार लाखनी यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील आलेसुर येथे भारत संचार निगम लिमिटेड चे 4जी टॉवर उभारण्यासाठी गावातील गट क्रमांक ४१० मधील २०० चौरस मीटर जागेची मागणी केली आहे. ही जागा गावातच असल्यामुळे गावापासून ५०० मीटर अंतरावर टॉवर उभारणी करावी. यासाठी तमुस अध्यक्ष नितीन श्यामकुवर यांनी तहसीलदार महेश शितोळे यांना निवेदन दिले आहे. 
           आलेसुर येथे भारत संचार निगम लिमिटेड चा 4जी मोबाईल व इंटरनेट टॉवर लावण्यासाठी पत्र क्रमांक एलएनडी २१/२०२२-२३ प. ह. ७ दिनांक ४/१/२०२३ नुसार गट क्रमांक ४१० आराजि ३.८० हेक्टर आर मधील ०.००२(२०० चौमी) जागेची बीएसएनएल ने मागणी केलेली आहे. या टॉवर मुळे गावात प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून टॉवर वर लहान मुले चढून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच टॉवर मुळे पशू पक्षांवर विपरीत परिणाम होऊन टॉवर मधून निघणाऱ्या किरणांमुळे गावकऱ्यांच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता तहसीलदार महेश शितोळे यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. 
            गावकरी व पशू पक्षांवर होणाऱ्या विपरीत परिणामाचा विचार करून हे मोबाईल टॉवर गावापासून ५०० मीटर अंतरावर तयार करावे. या करिता महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नितीन श्यामकुवर यांचे नेतृत्वात तहसीलदार महेश शितोळे यांना निवेदन देण्यात आले असून निखिल बोरकर, प्रफुल बोरकर, दुशांत श्यामकुवर, ममता श्यामकुवर, पदम राघोर्ते, मंगेश इसकापे, तुषार टीचकुले यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रतीलीपी जिल्हाधिकारी भंडारा, तलाठी लाखोरी यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर महसूल प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो. याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या