ओबीसी क्रांती मोर्चा महिलांनी मकरसंक्रातीचे अवचित्य साधून विधवा महिलांना मानाचे स्थान
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
भंडारा :- सावित्रीबाई फुले व मा.जिजाऊ यांच्या जयंतीचे अवचित्य साधून मकरसंक्रांत सण विधवा महिलासोबत अनोख्या पध्दतीने साजरा करत विधवा महिलांना मानाचा स्थान देऊन त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वतः विधवा असलेल्या महिलाध्यश शोबाबाई बानकर होत्या प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रोहनी आसवले,विना भुरे,माधुरी तुमाणे,सौ.नेहा श्रावनकर मंचावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन सौ.प्रा.किरण मते यांनी केले तर आभार प्रेरणा ठोबरें यांनी केले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले मा.जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन रोहन आसवले यांनी.त्यांनी सांगितले सावित्रीबाई फुले यांनी महिलाच्या शिक्षणाची सुरवात करून देशात एक नवीन क्रांती घडवायला सुरवात केली होती.परंतु देशातील बहुसंख्य कस्टकरी ओबीसी,बहुजन,दलित आदिवासी समाजक्तही मुली खूप मोठ्या प्रमाणात आजही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या क्रांती चळवळीचा लढा आजच्या परिस्थितीत सुद्धा अपूर्ण आहे त्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.मा.जिजाऊचे प्रेरणा घेत आजच्या नवीन युग काळात आपला शिवबा कसा घडेल यासाठी महिलांनी विचार करण्याची गरज आहे.
शोबाबाई बावनकर यांनी रूढी परंपरेला फाटा देत विधवा महिलांना पण आपल्या भारतीय सामाजिक संस्कृती मध्ये प्रत्येक सण उत्सवात विधवा महिलांना स्थान द्यावे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या वेळी स्वतः विधवा असतांना तब्बल 15 विधवा महिलांना मकरसंक्रातीचे अवचित्य साधून वाण देण्यात आले.
याप्रसंगी श्वेता बावनकर,विद्या मदनकर,संगीत मदनकर,पुण्य कोकासे, उर्वशी मदनकर,सौ.विना भुरे,यश्ववि पंचबुद्धे,याशिका गोडीचोर,लता बावनकुळे, मंगला बावनकुळे, अरुणा राऊत,रेखा तिरपुडे,उषा जांभूळकर,प्रेरणा ठोम्बरे,प्रमिला डोरले, भावना वैद्य,प्राजल वैद्य,राशी भुरे,जयश्री मस्के,ओमेश्वरी धोटे,सुनीता मदनकर,रश्मी सेलोकर,विद्या कुंभलकर, मोनाली जिभकाटे, मीना तुरस्कर,कल्याणी पात्रे, कनक उजवणे उपस्थित होते.


0 टिप्पण्या