Ticker

6/recent/ticker-posts

अवैध मुरूम उत्खनन करणारी जेसीबी सह ट्रॅक्टरट्रॉली पकडली

 गडेगाव शेतशिवारातील घटना 

११ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील गडेगाव शेतशिवारात विना परवानगीने जेसीबी चे साहाय्याने मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टर ट्रॉलीने वाहतूक केल्याप्रकरणी जेसीबी चालक रेवालाल मालिकचंद बोपचे(३५) रा. तिल्ली/मोहगाव, तालुका गोरेगाव, ट्रॅक्टर चालक लोकेश आनंदराव राऊत(३३) आणि मालक महेन्द्रकुमार रवींद्रसिंग कच्छवाय दोघेही राहणार गडेगाव, ता. लाखनी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून ११ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
           गडेगाव शेतशिवारात जेसीबी आणि ट्रॅक्टरट्रॉली लाऊन मुरूम उत्खनन सुरू असल्याचे गुप्त माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके, पोलिस हवालदार संजय अरकासे, पोलिस शिपाई हरिश्चंद्र देवकाते यांचेसह खासगी वाहनाने स्मशानभूमी रस्ता गडेगाव ह्या घटनास्थळी पंचासमक्ष गेले असता पिवळ्या रंगाची जेसीबी क्रमांक एमएच ३६ एल ७३४० ने मुरूम उत्खनन करून सिल्वर रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल १२५३ व लाल रंगाची ट्रॉली क्रमांक एमएच ३६ जी १३३२ मध्ये मुरूम भरतांना आढळून आल्याने त्यांना मुरूम उत्खननाची रॉयल्टी बाबद विचारणा केली असता त्यांचेकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. तसेच मालक महेंद्रकुमार कच्छवाय यांचे सांगण्यावरून ट्रॅक्टरट्रॉली ने मुरूमाची ने-आन सुरू असल्याचे सांगितल्याने जेसीबी किंमत ८ लाख, ट्रॅक्टरट्रॉली ३ लाख व २ ब्रास मुरूम ४ हजार रुपये असा एकूण ११ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके यांचे फिर्यादी वरून जेसीबी चालक, मालक आणि ट्रॅक्टर चालकावर अपराध क्रमांक ९/२०२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम ३७९, ३४ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुभाष राठोड तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या